सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
पाटणबोरी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. शंकरराव दानव यांच्या अकाली मृत्यू नंतर दि. १५ जून २४ रोजी केळापूर व झरी तालुक्यातील कार्यकर्त्यांची विशेष बैठक जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी यांचे मार्गदर्शनात घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ. मारोती कुमरे हे होते.
सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्यात पक्षाची मुहूर्तमेढ रोवून त्याचे वटवृक्ष करणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ.शंकरराव दानव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व मौन राखून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ.चंद्रशेखर सिडाम यांच्या सूत्रसंचालनात व प्रास्ताविक नंतर अनेक महत्वपूर्ण शेतकरी, कामगार , वनाधिकार, स्मार्ट मीटर, निवडणूक तसेच राजकीय, संघटनात्मक विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
माकपने जाहीर पाठिंबा दिलेल्या इंडिया आघाडी च्या चंद्रपूर लोकसभा उमेदवार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य व कार्यकर्त्यांचे पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
या विशेष बैठकीला पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, " शेतकरी, कामगार, दलीत, आदिवासी, महिला, विद्यार्थी व युवक यांच्या विरोधातील धोरणे घेणाऱ्या आणि संविधान बदलाविण्यासाठी चारशे पार ची घोषणा करणाऱ्या मोदी सरकारला जनतेने २४० वर थांबवून बहुमत पासून रोखले. परंतु कुबड्यांवर असलेली व तिसऱ्यांदा सत्तेवर बसलेल्या मोदी सरकारला सत्तेवरून चुकीचे निर्णयांची अंमलबजावणी करण्यापासून रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करून संघर्ष करण्यासाठी सज्ज व्हावे." असे आवाहन केले.
या बैठकीला प्रामुख्याने भाऊराव टेकाम, प्रकाश शंकरवार, सुभाष कोडापे, आडे, अय्या आत्राम, संतोष टेकाम, गजू बोरकर, दिलीप कूमरे, कोवेबाई, मारोती शिरपूरे, गजु वहिले, कनाके तसेच केळापूर व झरी तालुक्यातील अनेक गावातील स्त्री पुरुष उपस्थित होते.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केळापूर व झरी तालुक्यातील कार्यकर्त्यांची पाटणबोरी येथे विशेष बैठक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 15, 2024
Rating: