सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
पाटणबोरी : अनुसूचित जमाती पैकी कोलाम समाज हा अतिशय महत्त्वाचा घटक असून शासनाच्या विविध योजनेतून व कामापासून वंचित राहत असल्यामुळे श्यामा दादा कोलाम ब्रिगेडच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुरेश कुमरे यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्ह्यात कोलाम समाज जनसंवाद अभियान सुरू करण्यात आला असून याची सुरुवात झरी (जामणी) तालुक्यातील रायपूर या गावातून करण्यात आली असल्याची माहिती बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा तथा श्यामा दादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी संघटनेच्या विशेष प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.
पुढे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे की यवतमाळ जिल्ह्यात प्रामुख्याने झरि (जामणी) तालुक्यात बहुतांश आदिवासी कोलाम पोड ची मोठ्या प्रमाणात आहे पंचायत अनुसूचित क्षेत्रात विस्तार अधिनियम १९८६ केंद्र शासनाने दिनांक २४ डिसेंबर १९९६ रोजी अनुसूचित केला आहे. राज्यामध्ये साधारणता आदिवासी उपाय योजना क्षेत्र अतिरिक्त आदिवासी उपाय योजना क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्यात १३ जिल्ह्यातील ५९ तालुक्यातील २८३५ ग्रामपंचायत व ५९०५ गावे पेसा क्षेत्रात येतात अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत सक्षम व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याकरिता राज्य शासनाने अनेक योजना राबविल्या आहेत.
परंतु झरी जामणी तालुक्यात पेसा कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप शामा दादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी केला असून रायपूर कोलाम पोड वरील लोकांना विविध योजनेपासून वंचित राहावे लागत आहे त्यापैकी रायपूर फाट्यापासून पोहोच रस्ता सुरळीत नाही दफनभूमी करिता स्वतंत्र जमीन नाही घरकुल योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी नाही.
त्यामुळे घरकुल योजनेपासून कोलाम समाज वंचित आहे असे अनेक गावे आहेत. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत आदिवासी उपाय योजनेअंतर्गत ५% थेट निधी देण्याबाबत पेसा कायदा असताना अंमलबजावणी होत नाही म्हणून शामा दादा कोलाम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुंमरे यांनी विशेष पुढाकार घेऊन मा. अप्पर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती यांच्याकडे निवेदन सादर करून लेखी स्वरुपात मागणी केली असून संघटनेच्या वतीने कोलाम समाज जनसंवाद अभियानाची रायपुरातून सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती संघटनेच्या विशेष प्रसिद्धी पत्रकातून कळविली आहे
शामा दादा कोलाम ब्रिगेड च्या वतीने कोलाम समाज जनसंवाद अभियानाची रायपूर येथून सुरुवात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 03, 2024
Rating: