हिंगोली लोकसभेत कोण मारणार बाजी!

सह्याद्री चौफेर | लखन लोंढे 

महागांव : महिना भराखाली पार पडलेल्या नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाला आता आजचा दिवस शिल्लक राहीला असून या निवडणुकीत हिंगोली लोकसभेतून दुहेरी लढतीत कोण बाजी मारणार याकडे आता वाडी, तांडयातील नागरिकाचे लक्ष लागले आहे तर निकालाची उत्सुकता गाव, खेड्यात चांगलीच लागली असून मोबाईलवर सोशल मीडियावर, टीव्हीकडे नागरिकाचे अधिक लक्ष लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी २६ एप्रिल रोजी मतदान शांततेत पार पडले असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी चांगल्या प्रकारे झाली आहे.गेल्या महिन्या भरापूर्वी मतदान झाले असून देशातील लोकसभेचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. मतदानानंतर आता निकालाची तारीख व वेळ जवळच आली.असल्याने आता निकालाबाबत मतदारात तर्क, वितर्क लावत कोण निवडून येणार या बाबत कडक उन्हाळ्यात गरम खमंग चर्चा रंगली आहे.

हिंगोली लोकसभेसाठी मतदारसंघातील वाडी, तांड्यासह विविध गावात दुहेरी लढत झाली आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम पाटील कोहळीकर, महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर या दोघांमध्ये चांगली चुरस झाली आहे. व दोघांनीही चांगल्या प्रकारे मतदारांनी पसंती देत मतदान केले आहे. परंतु या दुहेरी लढतीमध्ये आता कोणाचा विजय होईल. व कोण किती मताने निवडून येईल या बाबत वाडी, तांड्यातील मतदारांमध्ये तर्क, वितर्क लावत सोशल मीडियावर पाहावयास मिळत आहे. तर टीव्हीवर देखील एक्झिट पोल च्या बातम्या सुरू असल्याने त्या बघण्यासाठी मतदारांनी अधिक पसंती देत. या बाबत मतदारांना त्यांची चांगलीच उत्सुकता लागली आहे.
हिंगोली लोकसभेत कोण मारणार बाजी! हिंगोली लोकसभेत कोण मारणार बाजी! Reviewed by सह्याद्री चौफेर on June 03, 2024 Rating: 5
Powered by Blogger.