अखेर बहुचर्चित T-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

BCCIने 1 जूनपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 साठी आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर चार राखीव खेळाडूंची निवड केली आहे. तसेच रोहित शर्मा पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.

यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा इव्हेंटचे आयोजन केले जाणार आहे, ज्यामध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत.

अशी असेल यंदाची टीम इंडिया : 
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान. 

दरम्यान, ऋषभ पंतचं अपघातानंतर संघात पुनरागमन होणार असून संजू सॅमसन आणि शिवम दुबे या खेळाडूंची पहिल्यादाच विश्वचषकासाठी निवड झाली तर अनुभवी kl राहुल संघात जागा मिळाली नसल्याचे दिसून आले आहे

 
अखेर बहुचर्चित T-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर..! अखेर बहुचर्चित T-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर..! Reviewed by सह्याद्री चौफेर on May 06, 2024 Rating: 5
Powered by Blogger.