सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था
राळेगाव : अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ व अप्पर आयुक्त अमरावती यांचे आदेशान्वये खैरी ग्रामपंचायतचे सरपंच हे ग्रामपंचायत अधिनियम 1969 चे कलम 14 ह नुसार अपात्र झाल्यामुळे खैरी ग्रामपंचायतचे सरपंच पद हे रिक्त झाले होते त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 38 (2) नुसार सरपंचाची निवड होईपर्यंत सरपंच पदाचा प्रभार हे खैरी ग्रामपंचायत उपसरपंच डॉ. श्रीकांत राऊत सांभाळतील असा आदेश गटविकास अधिकारी यांनी उपसरपंच यांना दिला.
1) अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे ग्रा.प विवाद 2078/69/14 ह/2022 चे पत्र. २) मा. अप्पर आयुक्त अमरावती विभाग अपिल क्र. 104/ विव्हिपी/16 (2) खैरी जि.प. यवतमाळ 2023 प्राप्त दि. 30/04/2024 चे आदेशानुसार, 3) सचिव ग्रा.पं. खैरी यांचा सरपंच पद रिक्त झाल्याबाबतचा अहवाल, दि.02/05/2024 च्या उपरोक्त संदर्भिय विषयान्वये ग्रामपंचायत, खैरी येथील सरपंच सौ. किरण तृशांत महाजन, ग्रामपंचायत अधिनियम 1969 चे कलम 14 ह नुसार अपात्र झाल्यामुळे सरपंच पद हे रिक्त झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 38 (2) नुसार सरपंच या पदाचे सर्व अधिकार व कर्तव्ये पार पाडण्याची जबाबदारी उपसरपंच यांची आहे.
यापुढे नियमानुसार सरपंच निवड होईपर्यंत ग्रामपंचायतींचे कामकाज पाहावे असा गटविकास अधिकारी यांनी उपसरपंच डॉ. श्रीकांत राऊत हे यापुढे खैरी ग्रामपंचायतचा प्रभारी सरपंच पद सांभाळातील असे आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे त्यापुढे खैरी ग्रामपंचायत चा सरपंच पदाचा प्रभार डॉक्टर श्रीकांत राऊत हे काम पाहतील. त्यांच्या पदभाराचे गावकऱ्यांसह मित्र परिवारातून अभिनंदन सह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
खैरी ग्रा.पं. चा सरपंच पदाचा प्रभार उपसरपंच डॉ. श्रीकांत राऊत यांचेकडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 10, 2024
Rating: