सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यात असा एकही दिवस नसेल ज्या दिवशी विजेचा लपंडाव झाला नाही. शहरासह ग्रामीण भागात विजेची समस्या सतत उद्भवत असते. तूर्तास विजेचा वारंवार होणारा लपंडाव व खंडीत वीज,अंखंडित वीज पुरवठा ठेवण्यात यावी अशा आशयचे निवेदन उपाभियंता कार्यालय मारेगाव यांना देण्यात आले.
आकापूर, नेत, गौराळा, वरुड, चिंचाळा या भागात अधूनमधून लपंडाव सुरूच असतो. वीज विभाग आणि अधिकारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून विजेचा लपंडाव व खंडीत होणे याला यश आले आहे. त्यामुळे यावर्षी चा उन्हाळा पाहता,जीवाची लाही लाही होत आहे. त्यातच लाईन मात्र दिवसातुन 50-60 वेळा बंद चालू असते. तसेच वीज बिलात मोठी रक्कम आवाजवी वाढ येत आहे.
अनेकदा वारंवार फोनव्दारे संपर्क करुन याबाबत अवगत करून सुद्धा वीजपुरवठा खंडित होण्याचाही प्रकार सुरू असतो. त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करावी अन्यथा मारेगाव वीज कंपनी चच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात येइल किंवा उपोषण करू, त्वापासुन होणाऱ्या परीणामास आपण स्वतः जबाबदार राहाल असा ईशाराही दिला.
बुधवारी (ता.29) मे रोजी दिलेल्या निवेदनावर मयुरी चंद्रकांत धोबे (गौराळा सरपंच), संदीप कारेकार (नेत सहपंच), गोवर्धन तोडासे (चिंचाळा सरपंच), अनुल गानफाडे (गौराळा उपसरपंच), सरपंच शशीकांत नावडे (चिंचाळा उपसरपंच), देवीदास भट (वरुड संरपंच) मनोज झट्टे,अनिकेत कारेकर,शुभम उपरे, आकाश जांभुळकर, प्रशांत धोबे,सागर राऊत,मयूर मरस्कोल्हे, अनिल कारेकर, विनोद कारेकर यांच्या सह्या आहेत.
मारेगाव तालुक्यात विजेचा लपंडाव नित्याचाच !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 30, 2024
Rating: