सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यवतमाळ : दिनांक 29/05/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अ उपड गुन्हे उघडकीस आणने व पाहिजे फरार आरोपीतांचा शोध घेणे संबंधाने पो.स्टे. वड़की हद्दीत पेट्रोलीग करीत असतांना गोपनीय बातमीदारकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, विलास नानाजी देवेवार व अविनाश संतोषराव निकम दोन्ही रा. सावित्री (पिपरी), बडकी, हे दोघेही इसम कोठारी ता. बल्लारशा जि. चंद्रपूर येथून भारत सरकारने प्रतिबंधीत केलेले अनाधिकृत कपाशी बियाने विक्री करीता ताब्यात बाळगुण ते स्वतःचे अधिक फायद्याकरीता एक सुझुकी ब्रेझा कार मध्ये वडकी येथे विक्री करीता घेवून येणार आहेत. अशी माहिती मिळाल्याने पथकाने त्याबाबत वरिष्ठाना अवगत करुन त्यांचे मार्गदर्शनानुसार कृषी विभागाचे अधिकारी व त्यांचे पथकास सोबत घेवून माहिती प्रमाणे खैरी बसस्थानक येथे सापळा लावून थांबले असतांना माहिती प्रमाणे सुझुकी ब्रेझा वाहन क्र. (एम एच 41, ई - 6196) हे खैरी बसस्थानकाकडे येतांना दिसल्याने पथकाने त्यास थांबवून वाहनातील दोन इसमांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे विलास नानाजी देवेवार (40), व अविनाश संतोषराव निकम (29) दोघेही रा. सावित्री-पिपरी, असे असल्याचे सांगितलं. दरम्यान कृषी अधिकारी व पथकांनी यांनी वाहनाची झडती घेतली असता वाहनाचे मागील सिट समोरील मोकळ्या जागेत एका प्लास्टीक पोत्यात अंदाजे 33 किलो खुले कपाशी बियाने किमंत अंदाजे 1,05,000/- रु.चे आढळून आल्याने त्यांना सदरचे बियाने कोठून आणले याबाबत विचारपुस केली असता त्यांनी ते बियाने सागर अरुण पारलेवार रा. कोठारी ता. बल्लारशा जि. चंद्रपुर यांचेकडून विक्री करीता आणले असल्याचे सांगितले आहे. नमुद इसमांकडे अनाधिकृत कपाशी बियाने विक्री करीता बाळगून असलेले मिळून आल्याने सदरचे बियाने व नमुद इसमांचे ताब्यात असलेले वाहन तसेच त्याचे कडील मोबाईल फोन असा एकूण 8,15,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पो.स्टे. वणी येथे तिनही इसमाविरुध्द कारवाई नोंद केली. तसेच दिनांक 27/05/2024 रोजी पो.स्टे. शिरपुर हद्दीतील कृषी विभागाचे अधिकारी यांना सोबत घेवून केलेल्या कारवाई मध्ये आरोपी अमोल विजय चिकनकर (33), रा. वार्ड नं.02 भालर, (ता. वणी) ह.मू. पिपरी-कापर (ता. वणी) याचे कब्जातून बलवान रिसर्च हायब्रीड कॉटन सिड 5 जी या अनाधिकृत कपाशी बियांनाचे 15 पाकीटे किमंत 18,000/- रुपये किंमतीचे जप्त करून पो स्टे. शिरपुर येथे त्याचे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, पियुष जगताप, आधारसिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्थागुशा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडुरे, पोलीस अंमलदार योगेश उगवार, सुधिर पांडे, सुनिल खंडागळे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, रजनिकांत मडावी सर्व स्थागुशा यवतमाळ तसेच राजे माळोदे, अमोल जोशी, प्रविण जाधव, कल्याण पाटील व सर्व कृषी विभाग यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
शासन प्रतिबंधित कपाशी बियाणे बाळगणे आले अलंगट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 31, 2024
Rating: