सरपंच सह असंख्य महिला पुरुष धडकले पोलीस ठाण्यावर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव :  मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खंडणी गट-ग्रामपंचात मेंढणी येथील अवैध दारु विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी मेंढणी-जानकाई पोड - खंडणी या गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आज (ता.6) मे रोजी मारेगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. 

मेंढणी गावाच्या रस्त्यालगत शेतात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारू विक्री होत असून ही दारू विक्री बंद करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, मारेगाव यांच्या मार्फत देण्यात आले आहे. सदर गावातील अवैध दारु व्यवसाय बंद न झाल्यास या विरोधात कायदेशीर उपोषणास बसण्यात येणार असल्याचा इशारा सरपंच सह तीनही गावातील उपस्थित लोकांकडून देण्यात आला आहे. 

यावेळी निवेदन देताना मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंढणी-जानकाई पोड-खंडणी येथील असंख्य महिला पुरुष हजर होते. 
सरपंच सह असंख्य महिला पुरुष धडकले पोलीस ठाण्यावर सरपंच सह असंख्य महिला पुरुष धडकले पोलीस ठाण्यावर Reviewed by सह्याद्री चौफेर on May 06, 2024 Rating: 5
Powered by Blogger.