ई-केवायसी केल्यानंतरच मदत थेट बँक खात्यात जमा होणार -जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांची माहिती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शेतकरी बंधूंनो आपण जर ई-पंचनामा केवायसी केलेली नसेल तर आपणाला ही ई-पंचनामा केवायसी करावी लागणार आहे, त्यानंतरच तुम्हाला मदत थेट बँक खात्यात तुमच्या जमा होईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसानीचे मदत बाधित शेतकरी यांना तत्काळ उपलब्ध व्हावी याकरिता शासन स्तरावरून ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले असून जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे 2023 अवकाळी पाऊस, मान्सून ऑक्टोंबर 2021, सप्टेंबर ऑक्टोबर 2022, जुन- जुलै 2023, अवकाळी पाऊस जानेवारी 2024 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांची नुकसानीची मदत बाधित शेतकरी यांना तत्काळ मिळावी याकरिता ई-पंचनामा पोर्टलवर तालुकास्तरावरून आतापर्यंत 2,75,739 बाधित शेतकरी यांची यादी अपलोड करण्यात आली असून जिल्हास्तरावरून नोंदी मान्य करण्यात आलेल्या आहेत. 

आतापर्यंत शासन स्तरावरून DBT पद्धतीद्वारे 3,24,749 बाधित शेतकरी यांचे खात्यात 229,58, 19,961/- इतका निधी जमा करण्यात आलेला असून बाधीत शेतकरी यांचे आधार बंद असणे, ई-केवायसी न करणे, आधार बँक खात्याशी लिंक नसणे, बाधित शेतकरी यांनी आधार प्रमाणीकरण/ बाधित शेतकरी यांनी E-KYC केली नसल्यामुळे अजूनही 47,675 बाधीत शेतकरी यांचे खात्यात मदत निधी शासन स्तरावरून वितरित करता आलेला नाही करिता बाधित शेतकारी यांनी तालुका कार्यालयातून/मंडळ अधिकारी तलाठी/कोतवाल यांचे कडून VK Number प्राप्त करून जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण/E- KYC करावे, त्यानंतरच शासनस्तरावरून मदत थेट त्यांचे बँक खात्यात जमा करण्यात येईल असे आवाहन यवतमाळ जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात येत आहे.
ई-केवायसी केल्यानंतरच मदत थेट बँक खात्यात जमा होणार -जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांची माहिती ई-केवायसी केल्यानंतरच मदत थेट बँक खात्यात जमा होणार -जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांची माहिती Reviewed by सह्याद्री चौफेर on May 06, 2024 Rating: 5
Powered by Blogger.