सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : आज रविवारी दुपारी अडीजच्या सुमारास बेमोसम अवकाळी वादळी पावसाने तांडव घातले. त्यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. सुमारे दीड ते दोन तास वादळी वाऱ्या सह ढगांचा गडगडाट व विजेचा कडकडाडत वीज कोसळून चार बोकड ठार झाली. तसेच चोपण येथे एका घराच्या लगत सुभाबळी च्या झाडावर वीज पडली. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र,या वादळी आकांताने चिंचमंडळ येथील धानोरा शिवारात एका नागरिकाचे बोकड ठार झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान,शेत शिवारात असलेल्या शेतकरी शेतमजूरांची तारांबळ उडून चांगलेच हाल झाले.