त्या लुटमार प्रकरणात 'लक्ष्मण'च निघाला मास्टर माईंड

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

वणी : पाच दिवसांपूर्वी वणी-घोन्सा मार्गावरील कोरंबी (मारेगाव) गावाजवळ घडलेल्या लुटमार प्रकरणात वाहन चालकाचा हेल्परच मास्टर माईंड निघाला. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या असून यातील फरार असलेल्या एकाचा शोध वणी पोलिस घेत आहेत.
लक्ष्मण शंकर मेश्राम (21) रा. मेसा ता. वरोरा असे मास्टर माइंड आरोपीचे नाव आहे. तो वणीतील पंचशीलनगरमध्ये वास्तव्याला आहे. त्यानेच कट रचून चार मित्रांच्या मदतीने ही लुटमारीची घटना घडवून आणल्याची बाब पोलिस चौकशीतून उघड झाली आहे. लक्ष्मणने रचलेल्या कटानुसार, त्याचे मित्र वैभव ऊर्फ कुणाल अनिल निखाडे (19) रा. दावत हॉटेलजवळ इंदिरा चौक वणी, अभिषेक बळीराम मेश्राम (21) रा. नायगाव ता. वणी, व राहुल सुनील राजुरकर (24) रा. नायगाव ता. वणी व अन्य एक आरोपी अशा चौघांनी ही लुटमार केली. वणी येथील किराणा व्यावसायिक राजेश तारुणा यांचे वाहेगुरु किराणा भंडार नावाने दुकान आहे. ते ग्रामीण भागात किराणा मालाचा पुरवठा करतात. 
16 मे रोजी त्यांनी आपल्या तीनचाकी मालवाहू वाहनात किराणा माल भरून चालक जितेंद्र रिंगोले याला घोन्सा, दहेगाव, रासा, या भागात पाठविले होते. यावेळी लक्ष्मण मेश्राम हा हेल्पर म्हणून सोबत होता. किराणा मालाचा पुरवठा व जुनी वसुली घेऊन परत येताना कोरंबी (मारेगाव) जवळील जनता शाळा परिसरात सायंकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान, दोन वेगवेगळ्या दुचाकीवर आलेल्या चौघांनी ऑटो अडविला व हेल्पर लक्ष्मण मेश्रामसह चालकाला मारहाण केली. त्यानंतर रोख असलेली बॅग हिसकावून घेतली, तर दोघांनी लक्ष्मणच्या खिशातील मोबाईल हिसकावून नेला.
त्या लुटमार प्रकरणात 'लक्ष्मण'च निघाला मास्टर माईंड त्या लुटमार प्रकरणात 'लक्ष्मण'च निघाला मास्टर माईंड Reviewed by सह्याद्री चौफेर on May 22, 2024 Rating: 5
Powered by Blogger.