सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : तालुक्यातील वनोजामार्गे देवी स्टॉप कडे वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्पर वाहन धारकांवर महसूल विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री जप्तीची कारवाई करून वाहन मारेगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
मारेगाव तालुक्यात काही घाट हर्रास झाल्यापासून वाळूची वाहतूक सुरू आहेत. मात्र, या वाहतुकीच्या आड विनापरवाना व नियमाला फाटा देत सुसाट वाळूची वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे दिवसभर ही वाहतूक होतांना दिसत नाही, मात्र सायंकाळीच ही वाळू वाहतूक सुरू असते हे सर्वश्रुत आहे. ह्यांची रात्रभर भुरभूर चालू राहते. ह्या सुसाट वाहतुकीने अनेक गावातील नागरिक त्रस्त आहे. मात्र स्थानिक पदाधिकारी, कर्मचारी सुस्त असल्याने यासंदर्भात तक्रारी प्रशासना दरबारी होत असल्याने ह्या प्रकारावर आळा घालण्यासाठी शिस्तप्रिय तहसीलदार म्हणून उत्तम निलावाड साहेब यांना आल्यापासून ओळखले जाते, त्यांनी असे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करून वाळू तस्करांचे मनःसुबे उधळून लावलेले आहे. व आताही मनःसुबे उधळून लावतच आहे. त्यामुळे अमरावती विभागात महसूलात भर पडली. परंतु ही भर डाऊन करण्याच काम तस्कराकडून कायम सुरू असल्याने महसूल विभाग ऍक्शन मोडवर आहे.
अशातच सोमवारच्या रात्री या परिसरात गस्तीवर असलेल्या महसूल पथकाला अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा टिप्पर क्र. (MH-29, BE- 9998) हे वाहन वनोजा मार्गे देवी (स्टॉप) कडे येत असल्याचे दिसताच देवी (स्टॉप) येथे त्या टिप्पर वर कारवाई करून वाळूचा टिप्पर तहसील कार्यालय मारेगाव येथे जमा केले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या वाहणात जवळपास तीन ते चार ब्रास वाळू असून ही कारवाई वणीचे नायब तहसीलदार खिरेकर, नायब तहसीलदार रमगुंडे यांच्या उपस्थितीत तलाठी गजूसिंग गुनावत, गजानन वानखेडे, एस एस कुळमेथे, विवेश सोयाम, मंगेश बोपचे यांनी केली. ह्या कारवाईने परिसरातील तस्करांचे धाबे दनाणले आहे.
वनोजादेवी 'स्टॉप' वर महसूल पथकाची 'धडक' कारवाई
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 21, 2024
Rating: