सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : तालुक्यातील उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्याने हा रस्ता बंद होतो. त्यामुळे उकणीवासीयांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामु़ळे शनिवारी (दि.11 मे) रोजी कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी वेकोलि अधिका-यांची भेट घेत याबाबत चर्चा केली. जर वेकोलिने वेळेत रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास वेकोलिविरोधात मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा संजय खाडे यांनी यावेळी दिला, याबाबत वेकोलिला तातडीचे निवेदन देण्यात आले.
वेकोलिने डम्पिंग टाकल्यामुळे उकणी-वणी हा मार्ग बंद झाला. त्यामुळे वेकोलिने दुसरा पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम सुरु केले. मात्र हे काम संथगतीने सुरु आहे. त्याचा फटका उकणीवासीयांना बसत आहे. पाऊस आल्यावर या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असून यात चारचाकी वाहने फसत आहेत. ही वाहने बाहेर काढण्यात चालकांना चांगलीच कसरत करावी लागते व इतर लोकांची मदत घ्यावी लागते.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राला सुरुवात होते. या नक्षत्रापासून पावसाला सुरुवात होते. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. रस्त्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने हे काम येत्या एक महिन्यात पूर्ण होणे अशक्य वाटत आहे. त्यामुळे वेकोलिने वेळेत काम पूर्ण करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना प्रा. शंकर व-हाटे, पुरुषोत्तम आवारी, संदीप कांबळे, बंडू खिरटकर, राजू चिंचोलकर रोशन देरकर, जीवन मजगवळी, किसन पारशिवे, मनोज खाडे, निलेश हिरादेवे, स्वप्नील गोवारदिपे, अजय खाडे यांच्यासह उकणी येथील रहिवासी उपस्थित होते.
वेळेत काम पूर्ण न केल्यास आंदोलनजून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाला सुरुवात होते. रस्त्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने हे काम येत्या एक महिन्यात पूर्ण होणे अशक्य वाटत आहे. उकणी येथील रहिवासी नेहमीच शिक्षण, काम, नोकरी, व्यवसाय यासाठी वणीला येतात. वेकोलिने वेळेत पक्का रस्ता बनवून दिला नाही तर वेकोलिविरोधात गावक-यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन उभारले जाईल.- संजय खाडेसंचालक कापूस पणन महासंघ
उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा - संजय खाडे यांचा ईशारा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 11, 2024
Rating: