सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका वरोरा येथील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारला दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी, वरोरा, जि. चंद्रपूर येथील मानव अविनाश राऊत (वय 15) हे दि. 26 मे रोजी मित्रां सोबत वर्धा नदीच्या पात्रातील मौजे दांडगाव (ता. मारेगाव जि. यवतमाळ) च्या बाजूने पोहण्यासाठी गेला असता पाण्यामध्ये बुडून मृत्यू पावला आहे. ही घटना अंदाजे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
वृत्तलिहेपर्यंत बुडालेल्या मुलाची बॉडी थोडयाच वेळापूर्वी सापडली असून ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे शवविच्छेदनासाठी आणण्याची प्रक्रिया चालू असल्याचे माहिती असून पुढील तपास संबंधित विभाग करित आहे.
नवयुवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 26, 2024
Rating: