सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : जनतेच्या समस्याना वाचा फोडणारी नवी चळवळ वणी विधानसभा मतदार संघात निर्माण झाली आहे. असं म्हणणं काही आता वावगं नाही. जन्मजात धाडसी वृत्ती, वादळे झेलण्याचा; अनेकदा अशी वादळे ओढवून घेण्याची बेदरकार वृत्ती आणि जनमानसाची नस ओळखण्याची कला या आधारे संजय खाडे यांना मिळालेली संधी राजकीय वर्चस्वात कशी बदलवली हे भल्या-भल्यांना कळले नाही. सध्या ते वणी विधानसभा मतदार संघात शेतकऱ्यांचा प्रश्न असो की, कामगारांच्या समस्या या जन आंदोलनाचे नेतृत्व संजयभाऊ खाडे भुषवित आहेत.
त्यांच्या झुंजार कार्य पध्दतीमुळे मतदार संघातील कार्यकर्त्यांना बळ मिळाले असुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पर्याय उपलब्ध झाल्याने कार्यकर्त्यामध्ये वेगळाच उत्साह दिसून येत आहे. वणी मतदार संघात श्री.खाडे, यांनी जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडीट को. आपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करुन आर्थिक विकासाचे रोपटे वणी शहरात लावले आहे. त्याच सोबत अनेक सामाजिक कार्यात ते नेहमीच सक्रिय असतात. म्हणूनच त्यांनी केलेल्या विविध कार्याची पावती म्हणुन नुकत्याच पार पडलेल्या वसंत जिनिंग च्या निवडणुकीसह मुंबई पणन महासंघाच्या निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळालं आहे. सरपंच पदासह ईतर संस्थाच्या कार्याचा अनुभव असल्यामुळे त्यांना मतदार संघात अनुभवी नेता म्हणुन त्यांची लोकप्रियता प्राप्त झाली आहे. नुकतेच संजयभाऊ खाडे मित्र परिवारातर्फे गुरुवारी 23 मे रोजी त्यांचा "अभिष्टचिंतन सोहळा" आयोजित करण्यात आला होता. वणी, झरी, मारेगाव, उपविभागीय क्षेत्रात आयोजित या अभिष्टचिंतन सोहळ्यात अफाट जनसमुदाय उसळला होता.
विशेष म्हणजे, वणी विधानसभा मतदार संघातील समस्यांची जाण, संजयभाऊ खाडे यांना असल्यामुळे भविष्यात या मतदार संघात प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळेल, असा आशावाद त्यांच्या चाहत्याकडुन व्यक्त होत आहे. या जन्मदिनी अनेकाकडुन त्यांच्या कार्याचा गौरव करुन पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. 'Thakns'आभार धन्यवाद! हे आशीर्वाद आणि प्रेम कायम आमच्या पाठीशी असु द्या असे, आवाहन देखील खाडे यांचेकरून करण्यात आलं आहे.
हे आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम आमच्या पाठीशी असु द्या -संजय खाडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 26, 2024
Rating: