सह्याद्री चौफेर | लखन लोंढे
महागांव : आई-वडील हे मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतात. मात्र, त्यांच्या या कष्टाचे चीज मुलांनी केल्यानंतर याचे समाधान त्यांच्यासाठी मोलाचे असते. याचप्रकारे दहावीच्या परिक्षेत ८५.८० टक्के गुण मिळवणाऱ्या सलोनी इंदल चव्हाण या विद्यार्थिनीने आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. आपल्या या यशाचे श्रेय तिने केवळ आई-वडिलांना दिले आहे.
सलोनीचे वडील इंदल चव्हाण व आई पुष्पा चव्हाण हे दांपत्य रोज मजुरी करतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, उरलेल्या पैशात प्रपंच आणि मुलीचं शिक्षण सलोनी ही श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टेंभी इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. दहावीत ८५.८० टक्के गुण मिळवत तिने आई-वडिलांची मान गर्वाने उंच केली आहे. ती अत्यंत गरिबी परिस्थिती वाढलेली. मात्र, कधीच कुठल्या गोष्टीसाठी तिने हट्ट केला नाही, अगदी पुस्तकांसाठी देखील. आई-वडील जेवढं देतील तेवढ्यातच तिने आनंद मानला. हे घवघवीत यश मिळवताना तिनेही स्वतः मोठे कष्ट घेतले. विशेष म्हणजे ट्युशन लावण्याची परिस्थिती नसल्यामुळे ती स्वतः घरी सकाळी सहा वाजल्यापासून तिचा अभ्यास सुरु व्हायचा त्यानंतर शाळा आणि पुन्हा सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत अभ्यास असा तिचा दिनक्रम होता.
आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे भान ठेवत सलोनीने दिवस रात्र अभ्यास करीत दहावीत चांगले गुण मिळवले. सलोनीला भविष्यात उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर बनायचं आहे. समाजसेवेचीही तिला आवड असून याद्वारे वृद्ध, दिव्यांग आणि गरीबांसाठी काम करण्याची इच्छा तिने आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखवली आहे.
आई-वडिलांच्या कष्टाचं चीज; ‘तिने’ दहावीत मिळवले घवघवीत यश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 28, 2024
Rating: