सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : 10 वर्षांचा असतांना वडिलांनी दुसरी पत्नी केली, त्यात घरची परिस्थिती हलाखीची, मायमाउलीने मोलमजुरी करून मुलाच्या शिक्षणात खंड न पडावं म्हणून आश्रम शाळेत टाकले. 8 वीपासून शिक्षण घेत-घेत 10 व्या वर्गात गेला. शेवटी त्याचे फळ मिळाले. ही कोणत्या चित्रपटाची कथा नाही तर ही खऱ्या संघर्षाची कहाणी आहे.
मारेगाव तालुक्यातील कानडा येथे राहणाऱ्या अनिकेत हनुमान कोवे ह्या विद्यार्थ्यांने परिस्थितीवर मात करत यश संपादन केलं आहे. अनिकेत नुकताच दहावीत पास झाला. त्याने या परीक्षेत 72 टक्के घेतले असून त्याचे विशेष कौतुक होत आहे. अनिकेत कोवे 4 थीत असतांना म्हणजे 10 व्या वर्षीच वडीलांनी पहिली पत्नी (अनिकेत ची आई) सोडून दुसऱ्या महिलेशी लग्न केले होते. म्हणून अनिकेतची अपंग आई मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होती. तर अनिकेत अभ्यासात हुशार होताच पण परिस्थितीने त्याला फार काही शिखर गाठता येत नव्हते. अपंग आईने मुलाच्या शिक्षणात खंड पडू नये, किंबहुना आपला मुलगा शिक्षणात कुठे मागे पडू नये म्हणून अनिकेत ला भद्रावती तालुक्यातील सुमठाणा येथील माध्यमिक आश्रम शाळेत टाकले.
तिथे तो आठवी पासून शिक्षण घेत होता, अनिकेत ने दहावीची परीक्षा दिली होती. आज सोमवार (दि.27) मे ला दुपारी 1 वा. ऑनलाईन 10 वीचा निकाल जाहीर झाला. त्यात त्याने अतिशय कठीण प्रसंगातून संघर्ष करत दहावी च्या परीक्षेत 72.60 टक्के घेऊन उत्तीर्ण झाला. एवढी हलाखीची परिस्थिती असतांनाही अनिकेत हे यश संपादन केले त्या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कठीण प्रसंगातून संघर्ष करत दहावीच्या परीक्षेत मिळवले यश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 27, 2024
Rating: