नामांतर चळवळीचा संघर्षशील योद्धा आणि कार्यकर्ते-नेते घडविणारं विद्यापीठ शांत झालं


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
 
मारेगाव : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा वारसा समर्थपणे चालविणारे पॅन्थर गंगाधरजी गाडे यांचे काल निधन झाले. पॅन्थर गंगाधरजी गाडे साहेब यांच्या जाण्याने फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

साहेबांच्या आक्रमकतेमुळेच येथील बहुजन, शोषित, वंचित पिढी त्यांची पाळं मूळ घट्ट होत गेली, बहरली, सुखाची फळ चाखत आहे. साहेबांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेला संघर्ष हा कोणीही नाकारू शकत नाही. विदर्भातून औरंगाबादेत आलेल्या या पॅन्थरने आयुष्यभर समाजाला न्याय देण्याचं काम केलं. आपल्यातील नेतृत्व कौशल्याने समाजातील अनेक तरुणांना घडवले. 
समाजातील अनेक नेते साहेबांच्या छत्रछायेतच वाढले,मोठे झाले. समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर लढण्यासाठी हा पॅन्थर सदैव पुढे असायचा. राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ उभारून आयुष्यभर केलेल्या या कार्यामुळे सदैव समाज मनात घर करून राहील.  
 
काल दिनांक ०४ मे २०२४ रोजी सकाळी ०४:३० वाजता गंगाधरजी गाडे यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवार दिनांक ५ मे रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत उस्मानपुरा,पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच रविवारी ४ वाजता अंत्यविधी केला जाणार आहे.
नामांतराच्या या लढावू योद्ध्यास अखेरचा क्रांतिकारी जयभिम

 
नामांतर चळवळीचा संघर्षशील योद्धा आणि कार्यकर्ते-नेते घडविणारं विद्यापीठ शांत झालं नामांतर चळवळीचा संघर्षशील योद्धा आणि कार्यकर्ते-नेते घडविणारं विद्यापीठ शांत झालं Reviewed by सह्याद्री चौफेर on May 05, 2024 Rating: 5
Powered by Blogger.