सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : आज तालुक्यातील सिंधी गावात गुरुवारी, 2 मे रोजी दुपारी शेतकर्याच्या 28 वर्षीय मुलाने शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना चार वाजता च्या दरम्यान उघडकीस आली.
घटनेची माहिती पोलीसांना दिली, पोलीस कर्मचारी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आला. राहुल गोविंदा काळे (अंदाजे वय 28) असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे.
राहुल यांच्या वडिलांच्या नावे सहा ते सात एकर शेती असल्याचे समजते. राहुल हा घरच्या शेतात व दुसऱ्याकडे सुद्धा मजुरीने कामाला जात होते. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून राहुल च्या पाठीमागे वडील, भाऊ, वहिनी, पुतण्या-पुतणी असा परिवार आहे. त्याच्या अशा अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सिंधी येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 02, 2024
Rating: