सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
पांढरकवडा : यवतमाळ रोड वर आयचर व ट्रेलर वाहनामध्ये समोरासमोर धडक झाल्याने या भीषण अपघातात दोन ठार व चार गंभीर जखमी झाले असून दोनशेच्या वर बकऱ्या ठार झाल्याची घटना आज (ता.2) मे गुरुवारला सकाळी 9 वाजता च्या सुमारास रुंझा गावाजवळ सायखेडा-पाथरी रस्त्यावरील वळणासमोरील धाबा जवळ घडली.
या अपघाताची माहिती मिळताच पांढरकवडा पोलीस स्टेशन चे पोलीस पथक घटनास्थळी लगेच रवाना झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार यवतमाळ वरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयचर वाहन क्र. (एम एच-४० सि.टी. ५५५८) ला वणी येथुन जाणारे ट्रेलर क्र. (एम एच-४० सि. एम.२८५८) यांची सामोरासमोर जोरदार धडक दिल्याने यात दोन इसम मृत्यूमुखी पडले असून, जवळपास दोनशे च्या वर शेळ्या जागीच ठार झाल्या तर, चार इसम गंभीर जखमी झाले आहे. मृतकामध्ये सोहन सिंह रामचरन यादव व धर्मेंद्र हीरालाल यादव अशी नावे असून दोघेही वाहन चालक मध्यप्रदेश येथील, असून कमलेश सिंह, मनोज मेहेरे, विदु मोहसिन खान, चेतन राठोड़ अशी जखमीची नावे असून हे सर्व मध्यप्रदेशचे आहे. हा अपघात इतका भयावह होता की,दोन्ही वाहणाचा दर्शनीभाग चेंदामेंदा झाल्याचे चित्र आहे.
या अपघातातील जखमींना ख्रिश्चन हॉस्पिटल उमरी येते भरती करण्यात आले तर, मृतव्यक्तीना उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे पाठविण्यात आले. दरम्यान या ठिकाणी वाहतूक कोलमडल्याची पाहायला मिळाली होती. घटनेची बातमी कळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदत कार्य केल्याने माणुसकीचे दर्शन घडले. सदर दोन्ही वाहने रोडच्या बाजूला करण्यात आले तर,आयचर वाहनांमध्ये असलेल्या शेळ्या खाली केल्या व ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली, या थरकाप उडवणाऱ्या घटनास्थळी पोलीस प्रशासनाला चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली असून पुढील तपास महामार्ग पोलीस केंद्र करंजीचे पोलीस निरीक्षक नितीन कोयलवार व पोलीस उपनिरीक्षक वसूकार तसेच पोलीस कर्मचारी करीत आहे.
भीषण अपघात...आयचर व ट्रेलरची समोरासमोर धडक; दोन ठार, चार जखमी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 02, 2024
Rating: