सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : तालुक्यातील विरकुंड आणि बोर्डा या मार्गावरील एसटी बस पुन्हा सुरु करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांना संपर्क साधून एसटी बस पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी आगार प्रमुखांची भेट व चर्चा करून विद्यार्थ्यासाठी बस सेवा पुन्हा सुरू केली.
नुकत्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपून शाळा महाविद्यालयांना सुट्या जाहीर झाल्या. उन्हाचा पारा देखील 40 अंशा वर गेला आहे त्यामुळे नागरिक देखील घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळांना सुट्या लागल्याने वणी तालुक्यातील विरकुंड आणि बोर्डा मार्गावरील एसटी बस च्या फेऱ्या बंद केल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना प्रवासात अडचण निर्माण होत होती. यासाठी विद्यार्थ्यांनी मनसेचे राजू उंबरकर यांच्याशी संपर्क करून बस सेवा सुरू करण्याची आग्रही मागणी केली. या मागणीला कोणताही विलंब न लावता तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह गुरुवार (ता.2) मे रोजी आगार प्रमुख खाडीलकर यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या तसेच तत्काळ एसटी बस सुरू करण्याची मागणी केली. या मागणीला आगार प्रमुखांनी सकारात्मकता दर्शवून बससेवा पुन्हा तात्काळ सुरू केली.
त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रवास करण्यास कोणतीही अडचण होणार नसल्याची माहिती मनसेचे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दिली. दरम्यान,विद्यार्थी आणि नागरिकांनी मनसेचे आभार मानले.
मनसेच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सुरू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 03, 2024
Rating: