26 वर्षांचा गणेश बेपत्ता, कुठेही आढळून आल्यास संपर्क साधण्याचे केले आवाहन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील गोकुल नगरातला 26 वर्षांचा गणेश भोयर हा मजुरीचे काम करतो. दि.9 मे 2024 रोजी दुपारी अचानक घरून निघून गेला याबाबत तो बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली असल्याचे अशी माहिती बेपत्ता युवकाचे चुलत भाऊ मंगेश विजय भोयर यांनी दिली आहे.

शहरात गणेश मोलमजुरीचे काम करायचा. काल शुक्रवारी दुपारी 12 ते 1 वाजता च्या दरम्यान तो घरून न सांगता निघून गेल्याने त्याच्या घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतु तो कुठेही आढळून आला नसल्याने तो बेपत्ता झाल्याचे लक्षात घेत 4 वाजता वणी पोलिसांना गणेश हा बेपत्ता झाल्याची माहिती दिली, अशी सह्याद्री चौफेर कडे माहिती प्राप्त झाली आहे.

पोलीस व भोयर कुटुंबाचे मात्र शोधकार्य सुरू असून सुंदर,देखणा  6 फूट उंची असलेला गणेश भोयर हा ज्याला कोणाला आढळून आला त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

संपर्क: 9579427344/7020426882/8080759236
26 वर्षांचा गणेश बेपत्ता, कुठेही आढळून आल्यास संपर्क साधण्याचे केले आवाहन 26 वर्षांचा गणेश बेपत्ता, कुठेही आढळून आल्यास संपर्क साधण्याचे केले आवाहन Reviewed by सह्याद्री चौफेर on May 10, 2024 Rating: 5
Powered by Blogger.