महिला कबड्डी स्पर्धेत नवयुवक क्रिडा मंडळ नागपूर विजयी.

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथील येथे न्यू फ्रेंड्स क्रिडा मंडळ व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित केलेल्या कब्बडी स्पर्धेत नवयुवक क्रीडा मंडळ नागपूर या महिला संघाने विजेतेपद प्राप्त केले. तर उपविजेतेपद जय भवानी महिला क्रिडा मंडल ढोरवासा यांनी तर तृतीय पुरस्कार संघर्ष क्रिडा मंडल नागपूर यांनी चतुर्थ पुरस्कार उडता हनुमान क्रिडा मंडल मुंबई यांनी पटकावीला. अंतिम सामान्यकरिता मॅन ऑफ दि मॅच चा बहुमान सुनीता बांगर या नागपूर संघाच्या महिला खेळाडूंने प्राप्त केला.बुधवार दि.31 जानेवारीला महिला व पुरुष कबड्डी सामन्याचे उदघाट्न झाले. या उदघाट्निय सामन्याचे उदघाटक युवक महिला काँग्रेस च्या सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार साहेब, आणि प्रमुख पाहुणे जेष्ठ नेते नानाजी खंडाळकर, पणन महासंघाचे संचालक नरेंद्र ठाकरे, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बाल कल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर, मार्डीचे सरपंच रविराज चंदनखेडे, पुसद अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा,  मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, हबीब खा पठाण, देविदास बोबडे, शांतीलालजी दुगड, यवतमाळ अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब मारोडकर, मारेगाव शहर अध्यक्ष शंकरराव मडावी साहेब, अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस नगरसेवक आकाश भाऊ बदकी, वसंत जिनिंग संचालक अंकुश माफूर,चिचमंडळ उपसरपंच प्रफुलभाऊ विखणकर,पोलिस पाटील प्रशांतजी पाटील, माजी सरपंच भास्करराव धानफुले, रामकृष्णजी चौधरी, श्रीमती तानेबाई सोयाम, ग्रामपंचायत सदस्य सुरेश चांगले, सुरज पंडीले, गणेश कनाके, छायाताई पुसाटे, शोभाताई कालर, मनीशाताई चौधरी, बेबीताई मोहूर्ले, मंगलाताई टिपले, माजी उपसरपंच प्रफुल झाडे, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मंगेशराव देशपांडे, विजयजी धानोरकर, मंडळाचे अध्यक्ष अक्षय सराटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्करराव धानफुले यांनी तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश नाखले यांनी व आभार प्रदर्शन मारोती गौरकार यांनी मानले.
महिला कबड्डी स्पर्धेत नवयुवक क्रिडा मंडळ नागपूर विजयी. महिला कबड्डी स्पर्धेत नवयुवक क्रिडा मंडळ नागपूर विजयी. Reviewed by सह्याद्री चौफेर on February 03, 2024 Rating: 5
Powered by Blogger.