सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
दरम्यान,परिसरात आणखी वाघ असल्याची चर्चा कायम सुरूच असल्याने आता वाघीण सुकनेगाव परिसरात तर नाही ना.. मग या पिलांचा मृत्यू कसा झाला असावा... काही वेगळे कारण तर नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. त्या छाव्यांचा मृत्यू भूकबळीने झाला असावा असा कयास वर्तविला होता. दरम्यान उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाला असुन त्यात या छाव्यांचा मृत्यू हा त्यांच्या पोटात काही नसल्याने भूकबळीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असुन वन विभागाच्या विविध पथकासह सर्च ऑपरेशन सुरु आहे. या रेस्क्यूत वणी, झरी, मारेगाव, पांढरकवडा येथील वन विभागाच्या पथक काम करित असून यात किरण जगताप भावसे उपवनसंरक्षक, पांढरकवडा वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर हटकर सहा. वनसंरक्षक, प्रभाकर सोनडवले वनपरिक्षेत्र अधिकारी वणी, टि.एन. सांळुंके, वंदना धांडे, पवार साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी पारवा यांच्या संयुक्त विद्यमाने वणी, मारेगाव, मुकुटबन वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी अधिकारी तसेच मा.श्याम जोशी मानद वन्यजीव संरक्षक यवतमाळ यांची टीम, रेस्क्यु टीम पांढरकवडा इत्यादी वनकर्मचारी सुकनेगावात दाखल झाले असुन 10 दल व 40 लेबर सह पुढील शोध मोहीम सुरु आहे.
वन विभागाचे विविध पथक व रेस्क्यू टीम सुकनेगावात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 03, 2024
Rating: