सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी शहरात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून सतत होणाऱ्या आत्महत्यांनी चिंता वाढविली आहे. नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. जीवनातील आव्हाने व संकटांना सामोरे न जाता आत्महत्येचा मार्ग निवडला जात असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. जीवन जगण्याची आस सोडून आणखी तालुक्यात आत्महत्या होऊ लागल्याने यावर प्रशासननाने जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहेत.
मृतक गणेश हा नळ जोडणी तथा दुरुस्तीचे (प्लम्बर) काम करायचा. त्याचा सात महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. आई व भाऊ रात्री झोपी गेल्यानंतर त्याने आपल्या खोली मध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
31 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 03, 2024
Rating: