मच्छिन्द्रा येथील त्रस्त शेतकऱ्याची कैफियत ऐकून सामाजिक कार्यकर्ता नारायण गोडेंनी जिल्हाधिकाऱ्यांना केली मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मारेगाव तालुक्यातील 42 वर्षीय त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्यांने वणी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना वहीवाटी चा रस्ता मोकळा करून देण्यात यावा अशी निवेदनातून आग्रही मागणी केली.

मारेगाव तालुक्यातील मच्छिन्द्रा येथे पांडुरंग उर्फ पंकज दत्तात्रय शेडामे हे येथील कायमचे निवासी आहे. पूर्वी त्यांना त्यांच्या घरापर्यंत बैलगाडी जाण्याजोगा एवढा रस्ता अस्तित्वात होता. त्याच रस्त्याने ते पूर्वीपासून वहीवाट करित होते, परंतु गावातील काही गैरअर्जदारांनी अतिक्रमण करून शेडामे यांचा रस्ता बंद केल्याचा त्यांचा आरोप आहे. ते गेल्या एक ते दिड वर्षांपासून रस्ता मोकळा करून द्यावा यासाठी पंचायत समिती मारेगाव, तहसील कार्यालय, जि प मुख्याधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे, तरी सुद्धा त्यांना रस्ता मिळाला नाही, असे निवेदनात नमूद आहे. मच्छिन्द्रा ग्रामपंचायत कडे लेखी तक्रार अर्ज देऊन मागणी करित होते. ग्रामपंचायतने सुद्धा लक्ष घालून वहीवाट रस्त्याची प्रोसेस केली परंतु पांडुरंग दत्तात्रय शेडामे यांना त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता अजूनही मोकळा होऊ शकला नाही, त्यामुळे त्रस्त शेतकऱ्याने वणी येथील सामाजिक कार्यकर्ता नारायण गोडे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. त्यांनी सर्व बाबी समजून घेतल्यानंतर आज वणी महसूल विभागात मा. जिल्हाधिकारी यवतमाळ हे आले असता त्यांची भेट घेऊन गोडे यांनी शेतकऱ्याचा विषय मांडला.

वणीचे तहसीलदार विवेक पांडे यांनी उपविभागीय अधिकारी, मच्छिन्द्रा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा करून कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. असे समाजसेवक नारायण गोडे यांनी सांगितले. गैर अर्जदारांनी कायद्याचा गैरवापर करू नये म्हणत पुढे ते म्हणाले की, सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आपण या त्रस्त शेतकऱ्याला न्याय द्यावा, शेतकऱ्याचा शेतातील माल त्याच्या घरापर्यंत गेला पाहिजे यासाठी त्यांना रस्ता आवश्यक आहे, अशी पांडुरंग शेडामे यांच्या वतीने आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ता नारायण गोडेंनी केली.

परिणामी गट ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालय मारेगाव, तहसील कार्यालय, मारेगाव, जि प मुख्याधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या कडून अपेक्षाभंग झाल्याने आता जिल्हाधिकारी यांच्या कडून आता अखेर न्यायाची अपेक्षा संबंधित शेतकऱ्याला लागली आहे. 
मच्छिन्द्रा येथील त्रस्त शेतकऱ्याची कैफियत ऐकून सामाजिक कार्यकर्ता नारायण गोडेंनी जिल्हाधिकाऱ्यांना केली मागणी मच्छिन्द्रा येथील त्रस्त शेतकऱ्याची कैफियत ऐकून सामाजिक कार्यकर्ता नारायण गोडेंनी जिल्हाधिकाऱ्यांना केली मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on February 03, 2024 Rating: 5
Powered by Blogger.