भर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला तरुणाचा मृतदेह, पांढरकवडा येथील खुन प्रकरणी दोघांना अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पांढरकवडा : केळापूर तालुक्यातील मागूर्डा ते वाई रोडवर एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली असून सचिन तुकाराम कुणघाटकर (23) रा.चंद्रशेखर वार्ड,सावतेली पुरा, पांढरकवडा असे मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव आहे.

सचिन हा पांढरकवडा येथील रहिवासी असून तो एका लग्नाच्या रिसेप्शन मध्ये रात्री 10 वाजेपर्यंत होता. त्या नंतर त्याचा संपर्क होत नव्हता. दरम्यान, सकाळी मागूर्डा ते वाई  रोड वर एक मृतदेह पडून असल्याची माहिती अशोक कोहचाडे (पोलीस पाटील) गवराई यांनी पोलीस चौकीत दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, मृतदेहाच्या डोक्यात मारून त्याचा खून केला असावा असे निदर्शनास आले. तसेच चेहऱ्यावर चार, पाच ठिकाणी शस्त्रा चे घावही दिसून आले. घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने, पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन तपासाच्या सूचना दिल्या. याबाबत मृतकाचे काका रमेश मारोती कुणघाटकर (53 ) रा. बेतवार ले आउट,पांढरकवडा यांनी पांढरकवडा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून पांढरकवडा पोलीसांनी अति शिग्र तपास करीत या प्रकरणी पांढरकवडा येथून दोघांना ताब्यात घेतले. सय्यैद अरबाज अली सय्यद मन्सुर अली (25) रा. मस्जिद वार्ड व अब्दुल रहेमान अब्दुल जब्बार (29) रा. मोबीनाबाद काॅलनी,पांढरकवडा अशी संशयितांची नावे आसून पोलीस त्यांची कसून चौकशी करित आहेत.

पांढरकवडा येथील खळबळजनक खुन प्रकरणी दोघांना अटक केली असून वरिष्ठ पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने, पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या सूचने नुसार पुढील तपास पांढरकवडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष गजभिये पो.हे.का प्रमोद जुनुनकर पो. का छंदक मनवर, पो. का राजु गेडाम, पो. का. राजु बेलेवार,पो. का.राजु मुत्यलवार पो. हे. का. राजेश सुरोशे करीत आहेत.




आरोपी ला ताबडतोब अटक करा व पांढरकवडा शहरात शांतता व सुव्यवस्था राहावी अशी मागणी घेऊन नातेवाईकांची व वार्डातील नागरिकांची पोलीस स्टेशन ला शुक्रवारी मोठी गर्दी उसळली होती. आरोपी लवकर अटक करून आम्हाला न्याय द्यावा असे ठाणेदार अमोल माळवे यांना सांगितले. तणावपूर्ण वातावरण व जमलेल्या नागरिकांना शांत करून धीर दिला व आरोपीला लवकर अटक करू अशी ग्वाही दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांनी आपल्या टीमला तपासाच्या सूचना देत या प्रकरणातील पांढरकवडा येथूनच तत्काळ दोघांना अटक केली.
भर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला तरुणाचा मृतदेह, पांढरकवडा येथील खुन प्रकरणी दोघांना अटक भर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला तरुणाचा मृतदेह, पांढरकवडा येथील खुन प्रकरणी दोघांना अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on February 03, 2024 Rating: 5
Powered by Blogger.