सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मार्डीत दि. 28 ते 30 जाने. असे तिन दिवशीय स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन इन्स्पायर इंग्लिश मिडीयम स्कुल येथे करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनाला उदघाटक म्हणून संस्था अध्यक्षा श्रीमती विद्याताई काळे तर अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक श्री. भास्करजी धानफुले सर होते. प्रमुख अतिथी म्हणुन सरपंच रविराज चंदनखेडे, उपसरपंचा सौ. शोभाताई कालर, रमेश खेकारे सर (मुख्याध्यापक, चिंचमंडळ), पो. पा. श्री. डॉ. प्रशांत पाटील, ग्रा.पं.सदस्य श्री. सुरेश चांगले व इतर सर्व सदस्य गण, मंगेश देशपांडे, संचालक सुभाष आवारी, मुख्याध्यापक श्री. सुमित आवारी सर व इतर पालक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाचे उदघाटन श्रीमती विद्याताई काळे व प्रमुख उपस्थित अतिथीच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. शाळेतील विद्यार्थींनी स्वागत गीत सादर करून शाळा संस्थेतर्फे मंचावरील अतिथींचे स्वागत व शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उदघाटन भाषणानंतर उपस्थित प्रमुख अतिथींनी व कार्यक्रमाचे अध्यक्षांनी विद्यार्थी व पालकांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.
त्यानंतर स्नेहसंमेलनातील पुढील सुरुवात झाली. यात प्रामुख्याने फॅन्सी ड्रेस स्पर्धा, एकल नृत्य व समुह नृत्य स्पर्धा, ऍक्ट-थिम्स तसेच पालकाकरिता "आई स्पेशल" स्पर्धा असे तीन दिवस अनेक भरगच्च कार्यक्रमाचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी पालकांची व प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम 30 जाने. ला सायं. 6 वा. घेण्यात आला. यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून सौ. किरणताई देरकर, सौ. वरारकर मॅडम, उपसरपंच सौ. शोभाताई कालर, सौ. निलिमाताई थेरे सरपंच सिंधी, मंगलाताई टिपले, बेबीताई मोहूर्ले, मनिषाताई चौधरी, छायाताई पुसाटे, सुरज पंडिले, गणेश कनाके सर्व सदस्य ग्रा. पं. मार्डी, पालक प्रतिनिधी म्हणून राजकुमार बोबडे, उज्वलाताई बुरडकर, मेघाताई गानफाडे, सुशांत बोबडे उपस्थित होते.
संमेलनाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुमीत आवारी, संचालन कु. स्वाती झोटींग तर आभार प्रदर्शन कु. तृप्ती ताठे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मुख्याध्यापक सुमित आवारी, रुपेश अलोणे, गंभीर कवाडे, ऋतुजा पाटणे, शितल बरडे, स्वाती निमसटकर, शारदा वाढई तसेच शिक्षेकत्तर कर्मचारी सौ. लता रोगे, उमेश पिंपळशेंडे, अविनाश गजबे यांनी परिश्रम घेतले.
मार्डी : इन्स्पायर इंग्लिश मिडीयम स्कुल येथे तिन दिवशीय स्नेहसंमेलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 04, 2024
Rating: