अनिल बेहराणी वणी पोलीस स्टेशन चे नवे ठाणेदार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : ठाणेदार अनिल बेहराणी यांना वणी पोलिस स्टेशनचा प्रभार देण्यात आला आहे. येथिल कर्तव्यदक्ष ठाणेदार अजित जाधव यांची जिल्हा बदली करण्यात आल्याने वणी पोलिस निरीक्षक म्हणून अनिल बेहराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस खात्यात बदल्यांचं सत्र सुरु झालं आहे. जिल्ह्यात 3 वर्ष कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्याचे आदेश धडकल्याने यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, उप पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जिल्ह्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या वणी पोलिस स्टेशनचाही समावेश आहे.

वणी पोलिस स्टेशनसाठी मोठी चढाओढ पहायला मिळते. या ठिकाणी बदली करून घेण्याकरिता आटोकाट प्रयत्न केले जातात. वणी पोलिस स्टेशन ला ठाणेदार म्हणून नियुक्ती मिळावी याकरिता सर्वतोपरी फिल्डिंग लावली जाते. परंतु या ठिकाणी कर्तव्यदक्ष व रुबाबदार ठाणेदाराची वर्णी लागावी अशी अपेक्षा बाळगण्यात येत होती. ठाणेदार अजित जाधव यांनी आपला कार्यकाळ यशस्वीरीत्या पार पाडला. वणी पोलिस स्टेशनचा कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांनी गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण मिळवलं. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर त्यांची वचक होती. परंतु निवडणुकीचा काळ असल्याने त्यांची जिल्हा बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर आता अनिल बेहराणी यांची ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बेहराणी यांच्याकडे वणी पोलिस स्टेशनचा प्रभार सोपविण्यात आला असून यापुढे नवनियुक्त ठाणेदार अनिल बेहराणी त्यांच्यावर शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबादारी राहणार आहे. तालुक्यातील गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. हे विशेष...
अनिल बेहराणी वणी पोलीस स्टेशन चे नवे ठाणेदार अनिल बेहराणी वणी पोलीस स्टेशन चे नवे ठाणेदार Reviewed by सह्याद्री चौफेर on February 04, 2024 Rating: 5
Powered by Blogger.