टॉप बातम्या

वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे याना पितृशोक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : वंचित बहुजन आघाडी चे मारेगाव तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे यांचे वडील पांडुरंग राजाराम दारुंडे यांचे आज मंगळवार ला सकाळी 7.30 वाजता चंद्रपूर येथे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे 75 वर्षाचे वय होते.

तीन महिन्यापूर्वी त्यांच्या मातोश्री चे निधन झाले होते. आज सकाळी (ता.13 फेब्रु.) रोजी साडे सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पांडुरंगजी दारुंडे यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुलं, जावई, स्नुषा व नातवंड असा बराच आप्त परिवार आहे.

आज मंगळवार ला दुपारी मारेगाव स्थानिक मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();