टॉप बातम्या

श्री चंद्रकांत रामराव आष्टेकर वृद्धाश्रमाला ब्लॅंकेट व शोभिवंत वृक्षाची भेट


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : लोकनिर्माण सामाजिक बहूउद्देशिय शिक्षण संस्था, कोसारा (सोईट) द्वारा संचालित श्री चंद्रकांत रामराव आष्टेकर वृद्धाश्रमाला आज मंगळवारी सेवाभावी पत्रकार मित्र मंडळ, मारेगावच्या वतीने सदिच्छा भेट देत दहा ब्लॅंकेट व विद्येचे शोभिवंत वृक्षाची भेट देण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक (वणी) तथा लोकवाणी जागर चे संपादक यांच्या हस्ते व महाराष्ट्र ट्रायबल आघाडी पक्षाचे मारेगाव तालुका अध्यक्ष तथा पत्रकार कुमार अमोल कुमरे, सिंहझेप चे तालुका प्रतिनिधी पंकज नेहारे, लोकवाणीचे तालुका प्रतिनिधी आनंद नक्षणे, यांच्या उपस्थितीत वृद्धाश्रमाला भेटवस्तू देण्यात आली.

यावेळी वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक बारसुजी परसराम नागोसे, कर्मचारी एकनाथ बावणे, मदतनीस हर्षा बावणे आदींची उपस्थिती होती.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();