सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : येथील कालिंदा दिगांबर नारेकर (वय 84) प्रभाग क्र. सहा, रहिवाशी असून ह्या गेल्या चार ते पाच वर्षांपासून अंथरुणावर आहे. त्यामुळे त्या बँकेत जाऊ शकत नाही, जेष्ठ नागरिक असल्यामुळे व त्या खाटेवर असल्याने पेन्शन धारकाच्या नातेवाईकांनी पेन्शनर धारकांचे मेडिकल सर्टिफिकेट संबंधित बँकेला सादर केले असताना देखील सेंट्रल बँकेतील अधिकारी अरेरावी ची भाषा करून पेन्शन धारकांच्या त्या नातेवाईकाला अपशब्द बोलून पेन्शन रोखण्यात आले अशा आशयचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
शहरातील श्रीमती कालिंदा नारेकर ह्या 84 वर्षाच्या असून आज त्या खाटेवर आहे, त्यांची संडास व लघुशंका जागेवर आहे. पाय सुजलेले आहे. डॉक्टरच्या मेडिकल प्रिस्कीप्शन त्याच प्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट नुसार ती कुठेही जाऊ शकत नाही अथवा चालू शकत नाही असे त्यांचे जावई श्रीकांत तांबेकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे.
जेष्ठ नागरिक असल्यामुळे हा अत्यन्त गंभीर व जिव्हाळ्याचा विषय असताना सेंट्रल बँकेतील मॅनेजरने सादर केलेल्या माहिती किंबहुना सर्टिफिकेट ला धुळकवून लावत याचा काही उपयोग नाही अशा शब्दात माघारी पाठविले. त्यांना बँकेत उचलून आणा, तुम्ही जास्त बोलू नका मि पोलिसांना बोलावेल अशी धमकी दिल्याची श्रीकांत तांबेकर यांची तक्रार आहे. पुढं असंही म्हटलं आहे की पेन्शनर च्या नातेवाईकांना मानसिक त्रास देण्याचं काम करित आहे. पेन्शनरला पाहण्यासाठी अथवा जीवित अथवा मृत आहे किंवा नाही, हे संबंधित बँकेतील अधिकारी वा कर्मचारी त्या पेन्शनरच्या घरी जाऊन पाहणं चौकशी करणे क्रमपात्र असताना सुद्धा आम्ही कर्मचारी पाठवू शकत नाही, अशी उद्धट भाषा वापरून त्यांना बँकेतून हाकलून लावले असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे सन्माननीय तहसीलदार साहेब आपण त्यांना आमच्या व्यथा त्यांच्या पर्यंत पोहोचवून आम्हांला न्याय द्यावा अशी आग्रही मागणी त्यांची आहे. अन्यथा संबंधित बँकेच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडू असे पेन्शनर ह्यांचे जावई श्रीकांत तांबेकर यांनी 'सह्याद्री चौफेर' बोलताना सांगितले.
खाटेवर असलेल्या पेन्शन धारकांच्या नातेवाईकांना बँकेने लावले धुडकावून
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 08, 2024
Rating: