यमुनाताई दारुंडे अनंतात विलीन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शहरातील चोखाजी एच पी गॅस एजन्सीचे संचालक राजूभाऊ दारुंडे यांच्या आई यमुनाताई चोखाजी दारुंडे ह्यांचे काल बुधवार ला सुभाष नगर येथील स्वगृही निधन झाले. त्यांचे मृत्यूसमयी 72 वर्षाचे वय होते.

यमुनाजी दारुंडे यांना गेल्या चार दिवसापूर्वी डोक्याला अर्धांगवायुचा तीव्र झटका आला. त्यांना तत्काळ चंद्रपूर येथील एका खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावत असल्याने काल बुधवार दुपारी त्यांना प्राणवायूवर आणण्यात येवून निवासी ठेवण्यात आले. मात्र दुपारी 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

त्यांच्या पाठीमागे दोन मुली, एक मुलगा, जावई, स्नुषा, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
आज गुरुवार ला सकाळी 10 वाजता यवतमाळ रोड वरील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

यमुनाताई दारुंडे अनंतात विलीन यमुनाताई दारुंडे अनंतात विलीन Reviewed by सह्याद्री चौफेर on February 01, 2024 Rating: 5
Powered by Blogger.