सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी शहराच्या काही अंतरावर मंगळवार पासून धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम ऐकूण जयश्री शंकर उमाटे (49), मुलगा प्रतिक शंकर उमाटे (25) रा. सुर्यमंदिर वार्ड (ता.भद्रावती), व जाऊ चित्रा सुरेश उमाटे (55) हे तिघेही मोटारसायकल क्रमांक (MH-34 CE- 3120) ने ट्रिपल सीट वणीहून आपल्या गावाच्या दिशेने निघाल्याचे समजते. अशातच परत जात असताना वाटेत जयश्रीला फिट आली. फिट आल्याने तिचे मोटारसायकल वरून बॅलन्स बिघडले व ती रस्त्या वर धाडकन आदळली.
दरम्यान, मुलगा प्रतीक, व चित्रा सुरेश उमाटे हे रस्त्याच्या कडेला पडले. अशातच मागून येणाऱ्या भरधाव बस क्रमांक (MH-14 HG-8227) वणी-चंद्रपूर या बस चे मागील चाक जयश्रीच्या अंगाच्या काहीभागावरून गेले. दुर्दैवाने त्या जागीच ठार झाल्या तर, मुलगा व जाऊ हे जखमी झाले. जयश्री यांना नेहमीच फिट यायची असे समजते. ठार माहिलेचा मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून या घटनेची माहिती मृतकाचा कुटूंबियांना देण्यात आली. घटनेचा पंचनामा करून पुढील तपास वणी पोलिस करीत आहे. मात्र या भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होतांना दिसली.
धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेऊन गावाच्या दिशेने परत जाताना दुचाकीला अपघात, एक ठार, तर इतर दोन जखमी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 01, 2024
Rating: