महसूल विभागाची धडक कारवाई : कोसारा परिसरात अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त, तर एक वाहन घेऊन फरार...
सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : तालुक्यातील कोसारा परिसरात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली. या जप्ती च्या कारवाई ने रेती तस्करांचे धाबे चांगलेच दनाणले असून ही पावरफूल कारवाई तहसीलदार निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गुघाने (मंडळ अधिकारी), तलाठी शैलेंद्र कुमार शिंगणे, विवेश सोयाम, सनदेवल कुळमेथे या महसूल टीम ने केली. दरम्यान,अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कार्यवाही करीत असताना एक चालक वाहन घेऊन फरार झाल्याचे समजते.
मारेगाव तालुक्यातील कोसारा घाटावरून रेतीची तस्करी नित्याचिक झाली आहे तरी, तहसीलदार निलावाड कार्यालयात रुजू झाल्यापासून रेती तस्करी वर काही प्रमाणात आळा घातला गेला असला तरी,रेती तस्कर महसूल विभागाच्या प्रत्येक हालचाली वर कटाक्षाने लक्ष ठेऊन आपले हित साधत असतात. परंतु महसूल प्रशासन हे सुद्धा या रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी रात्रंदिवस एक करित आहे, त्याची प्रचिती काल बुधवार च्या सायंकाळी सहा वाजता सोईट (ता. वरोरा) ते कोसारा रोडवरील कोसारा गावा लगत अवैध उत्खनन करून वाहतूक करीत असलेले रेतीचे दोन ट्रॅक्टर महसूल पथकानी पकडले. व दंडात्मक कारवाई करिता तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
मारेगाव तालुक्यात हर्रास नसताना चांद रात्रीस मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असून, यात लाखों रुपयाचा महसूल रेती तस्करांकाकडून शासनाला चुना लावला जात आहे. यात काही राजकीय नेत्यांचा सुद्धा समावेश आहे.
परिणामी, रेती तस्करांच्या अफलातून मुजोऱ्या वाढून प्रशासनाला तुरी देण्याचे षडयंत्र नित्याचेच झाले असून सातत्याने महसूल विभागाने तस्करावर आळा घालण्यासाठी कंबर कसली असून रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी पारदर्शक अधिकारी तहसीलदार निलावाड, मंडळ अधिकारी घुगाने, तलाठी कुळमेथे, तलाठी शिंगणे, तलाठी सोयाम व ड्रायवर विजय हे सातत्याने प्रयत्न करित आहेत.
महसूल विभागाची धडक कारवाई : कोसारा परिसरात अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त, तर एक वाहन घेऊन फरार...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 31, 2024
Rating: