वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर OBC, VJ, NT, SBC, चा एल्गार मोर्च्याच आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सरकारने OBC (VJ,NT, SBC) वी जातनिहाय
जनगणना करावी तसेच मराठा समाजाल सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये व त्यांचा 'ओबीसी' मध्ये समावेश करण्यात येऊ नये या प्रमुख मागन्या व इतर 18 मागण्या घेऊन OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महिला समन्वय समिती, वणी-मारेगोव-झरी जि. यवतमाळ यांनी वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर "एल्गार मोर्चा" चे दि. 11 फेब्रु 2024 ला दुपारी आयोजन करण्यात आलेले आहेत.

मागिल अनेक वर्षापासून मागणी होत असलेली ओबीसीची जात‌निहाय जनगणना केंद्र व राज्य सरकारने करावी, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना कररावी ही मागणी जातनिहाय जनगणना कृती समिली क्रीत आहेत. परंतू आत्तापर्यंत केंद्र व राज्य सरकारने ठोस पावले उचलली नाहीत. तसेच मराठा समाजाच्या दबावामुळे सरकारकडून त्यांना ओबीसीत समावेश करण्याचा घाट घातल्या जात आहे. ही बाब ओ बी सी साठी अन्याय‌कारक असून आहे. त्याचबरोबर विद्याथ्र्यांचे प्रश्न, शेतकयांचे प्रश्न, सरकारी कर्मचारी यांचे विविध प्रश्स घेऊन ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीकडून सरकारविरोधात एल्गार पुकारलेल आहेत. तरी OBC (VJ, NT, SBC) बलवेव ओबीसी तील विविध जातसमूहाने आपल्या मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी, समाजाच्या भवितव्यासाठी लाखोंच्या संख्खेने मोर्च्यात मुलाबाळासहित सहकुटुंब सहपरिवार,. आप्तस्वकीय, नातेवाईक, मित्रमंडळीसह सहभागी व्हावे' असे आवाहन OBC (VJ, NT SBC) ज्ञातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष, निमंत्रक यांचेसह सर्व सभासदानी केलेले आहेत, शासकीय मैदान, वणी येथुन मोच्यान प्रारंभ करून समारोव सुद्धा शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ वणी येथे होणार आहेत. समारोप सुद्धा शासकीय मैदानात होणार आहे त्यानंतर सदर मोर्च्याच रुपांतर सभेत होऊन त्याठिकाणी सभेला डॉ. लक्ष्मण यादव (प्रसिद्ध वक्ते तथा ओबीसी विचावंत, दिल्ली) हे संबोधित करणार आहेत. सभेनंतर शिष्टमंडळ मा उप‌विभागीय अधिकारी, वणी योना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

शासकीय मैदानावरुन प्रारंभ करून पुरुष व महिला हयानी रांगेत संपूर्ण शहरात विविध घोषणाबाजी करित शांततेत मोच्या करावा मोर्च्या दरम्यान कोणीही हूल्लडबाजी, कोणत्याही सामाजिक संघटना वे पक्षा विरुद्ध शेरोबाजी करुन मोर्च्याला गालबोट लावू नये. हा मोर्चा कोणत्याही पक्ष व समाजाविरुद्ध नसून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आहे याची सर्व OBC CVT, NT, SBC) च्या समाज‌बांधवांनी नोंद घ्यावी असे आवाहन एल्गार मोर्चा'च्या आयोजकांनी केलेले आहेत.


वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर OBC, VJ, NT, SBC, चा एल्गार मोर्च्याच आयोजन वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर OBC, VJ, NT, SBC, चा एल्गार मोर्च्याच आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on January 27, 2024 Rating: 5
Powered by Blogger.