सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील गोंड बुरांडा येथील मोदी आवास घरकुल योजनेच्या घरकुल यादीत लाभार्थ्यांची नावं असून सुद्धा वारंवार वगळण्यात येत असल्याने त्रस्त झालेले लाभार्थी, घरकुल आज मिळेल, उद्या मिळेल म्हणून..अखेर ते पंचायत समिती कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे.
मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जात असून या ठिकाणी इतर समाज बांधव बहुसंख्येने राहतात. त्यातल्या त्यात घरकुल योजनेचे लाभार्थी बहुसंख्येने सर्वसामान्य गरजू भूमिहीन असून त्या लोकांना घर राहायला नाही, त्यामुळे काही लाभार्थी आपल्या हक्काच्या घरासाठी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारताहेत. परंतु त्या लाभार्थ्यांना ग्रामपंचायत पदाधिकारी घरकुल यादीतून डावलत असल्यामुळे ते आपली कैफियत मांडून संबंधित कार्यालयातून आल्या पावली परत जात आहे.
विशेष म्हणजे घरकुल योजनेच्या यादीत त्यांची नावं दोनदा समाविष्ट करण्यात आले,अशी गोंड बुरांडा येथील लाभार्थी प्रमोद अतकर, राजू अतकर व पंढरी दगडे ह्यानी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना सांगितले. गावात राजकारण आड येत असल्याचेही ते म्हणाले. याबाबत आम्ही रीतसर अर्ज पंचायत समिती कडे मागणी साठी करण्यात आला असून संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव मनमानी कारभार करित असल्याबाबत त्यांची तक्रार आहे. त्यामुळे निकषाप्रमाणे घरकुल योजनेचा लाभ आम्हा गरजू लोकांना देण्यात यावा व चिरीमिरी करण्याऱ्यावर कडक शासन करावे अशी मागणी लाभार्थ्यांची आहे.
घरकुल लाभार्थी झिजवत आहे पंचायत समिती कार्यालयाचे उंबरठे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 27, 2024
Rating: