वणी-यवतमाळ महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रकच्या धडकेत एक ठार, सहा जखमी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वणी-यवतमाळ महामार्गावरील निंबाळा फाट्याच्या समोरील उतारात भरधाव अठरा चक्की ट्राला ने वणी कडे येत असलेल्या अर्टिका कार ला समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना आज बुधवारला दुपारी घडली. 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेख नवाज मुजफ्फर शेख (वय 28), हा मृत्यू पावल्याची माहिती आहे. झेबा शेख बरकत (25), हाजरा शेख मुजफ्फर (60), हसनेन शेख बरकत (4), अहमान शेख बरकत (दीड वर्ष ), कमर सय्यद (38) हे सर्व मारेगाव व आलिया शेख (15) रा. मार्डी असून अपघातात जखमीची नावे आहे. जखमींना वणी येथे दाखल करण्यात आले असून यातील तिघांना चंद्रपूरला हलविण्यात आले असे समजते.

हे सर्वजण चंद्रपूर येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी (एम एच 13-डीइ 7906) अर्टिका ने चंद्रपूर जात होते, अशातच वणी कडून येत असलेल्या जगन्नाथ ट्रान्सपोट कंपनी चा ट्राला क्र. (एम एच-34 बिजी -1337) ह्याने समोरील येणाऱ्या कारला दुपारी 1 च्या सुमारास धडक दिली. यावेळी कारमध्ये एकूण सात जण होते. तर शेख नवाज हे कार चालवत होते. 
दरम्यान त्यांच्या कारला आज (ता.24) ला दुपार च्या सुमारास निंबाळा फाट्या समोरील उतारात आले असताना अर्टिका कारला महामार्गावर ट्रालाच्या चालकाने धडक देत रस्त्याच्या कडेला फरफटत नेले. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या समोरील दर्शनीभागाचा चक्काचूर झाला आहे. यात एक जण ठार झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. सदर घटनेची वार्ता पसरताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. 
वणी-यवतमाळ महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रकच्या धडकेत एक ठार, सहा जखमी वणी-यवतमाळ महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रकच्या धडकेत एक ठार, सहा जखमी Reviewed by सह्याद्री चौफेर on January 24, 2024 Rating: 5
Powered by Blogger.