विजय चोरडिया यांची भारत सरकार मंत्रालय अमरावती विभाग दूरसंचार सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड

सह्याद्री चौफेर । दिगांबर चांदेकर 

वणी : भारत सरकारच्या दूरसंचार अमरावती विभागीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी वणी येथील समाजसेवक विजयबाबू चोरडिया यांची निवड करण्यात आली आहे.

भारत सरकार संचार मंत्रालय अमरावती विभागीय दूरसंचार सल्लागार समिती सदस्य पदी दि,12 डिसेंबर 2023 रोजी दूरसंचार भारत सरकार विभाग न्यू दिल्ली विशेष अधिकारी दिनेश कूमार चंद्रा यांचे परिपत्रक प्राप्त झाले,त्यांना दूरसंचार सल्लागार समिती अमरावती विभागीय समितीवर काम करण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल आमदार मदनभाऊ येरावार,माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराजभय्या अहिर,आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार,भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे,माजी भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन भूतडा याना ते श्रेय देत आहे.

विजयबाबू चोरडिया यांनी वणी उपविभागीय क्षेत्रात बरेच दिवसापासून समाजोपयोगी उपक्रम राबविले आहे,गरजू लोकांना शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा नेहमीच असतो,गोरगरीबांच्या आरोग्याची काळजी घेऊन अनेकदा स्वखर्चाने मोफत आरोग्य शिबीर घेऊन सातत्यांने सेवा देत आहे. विजयबाबू चोरडिया त्यांच्या या नियूक्तीबद्दल वणी विधानसभाक्षेत्रातील नागरिक,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत करून पूढील वाटचालीस शूभेच्छा दिल्या आहे.
विजय चोरडिया यांची भारत सरकार मंत्रालय अमरावती विभाग दूरसंचार सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड विजय चोरडिया यांची भारत सरकार मंत्रालय अमरावती विभाग दूरसंचार सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on January 11, 2024 Rating: 5
Powered by Blogger.