...अशी चर्चा वाळू तस्कर व प्रशासनात उडाला रात्री थरार..


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शहराच्या चार किमी अंतरावर काल रात्री अंदाजे दहा च्या सुमारास करणवाडी फाट्या वर अवैध वाळू भरलेला ट्रक पकडल्यामुळे वाळू तस्कर व प्रशासनामध्ये शाब्दिक बाचबाची मध्ये थरार घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाल्याची चर्चा आहे.

तालुक्यात घाट बंद असल्यामुळे वर्धा नदीच्या पात्रातून राजरोसपणे वाळूची तस्करी जोमात सुरू आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रशासन कायम ऍक्शन मोड वर असताना, काल रात्री करणवाडी फाट्यावर एक विशेष पथक गस्त घालत असताना, वाळू भरलेला ट्रक करणवाडी फाट्यावर येताच पकडला. कारवाई सुरु होताच कारने मागून आलेल्या शस्त्रधारिमध्ये 'तू तू मैं मैं' झाल्याने कारवाईत अडथळा निर्माण झाला. त्या ठिकाणी घडलेल्या प्रकाराने वाळू तस्करासमोर प्रशासन हतबल झाल्याची खमंग चर्चा रात्रीपासून सुरू आहे..हे प्रकरण ठाण्यापर्यंत गेलं,पण आरोप प्रत्यारोप झाल्याने कुछ हो न सका,अशीही चर्चा होत होती. 

तालुक्यात वाळू उपसा रात्रंदिवस असून वाळू ची चोरी सर्वश्रुत आहे, घरकुल लाभार्थ्यांसह बांधकामांना वाळू मिळत नाही. आणि एवढा मोठा थरार होऊन कुठेही लेखी नाही. हा सर्व देखावा तर नाही ना, जनमानसात चर्चा व्हावी यासाठी तर नाहीना... संबंधिताशी नेमकं काय प्रकार आहे यासाठी संवाद करण्याचा प्रयत्न असफल राहिला, मात्र वेगवेगळ्या चर्चा अजूनही जनमानसात जोर धरत आहे.

करणवाडी फाट्यावर रात्रीचे सिनेनाट्य...

कुंभा मार्गाने करणवाडी फाट्यावर वाळू भरलेला ट्रक दहा च्या सुमारास आला, दरम्यान ट्रक थांबवीला असता दंडात्मक कारवाईला सुरुवात होणार, तितक्यात चारचाकी वाहणातून चार पाच लोक आली. तिथे शाब्दिक तर झालीच. मात्र फाट्यावर धारदार शस्त्र निघाल्याने त्या ठिकाणावरून कर्मचारी, उपस्थित राजकीय पुढाऱ्यात पळापळ सुरु झाल्याची चर्चा अख्या तालुक्यात सुरू आहेत..यावर विविधांगी चर्चा होत असताना एखाद्या सिनेनाट्यप्रमाणे सर्व रात्रीचे थरार असल्याचं ऐकिवात आहे. 


...अशी चर्चा वाळू तस्कर व प्रशासनात उडाला रात्री थरार.. ...अशी चर्चा वाळू तस्कर व प्रशासनात उडाला रात्री थरार.. Reviewed by सह्याद्री चौफेर on January 11, 2024 Rating: 5
Powered by Blogger.