सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मारेगाव ठाण्यातंर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील एका 23 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला अत्याचार आणि पोक्सो कायद्यात अटक करण्यात आली.
तालुक्यामधील तूर्तास वेगवेगळ्या गावात राहणाऱ्या संशयित आरोपीचे गावातीलच एका आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थीनी वर इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची ओळख होत ते प्रेमात आकंठ बुडाले. त्या अल्पवयीन मुलीवर त्याने विश्वासात घेत वारंवार तिच्याशी जवळीकता साधली. यातच तीच्या पोटात दुखू लागले, डॉक्टरांच्या तपासणी अंती विद्यार्थीनी नऊ आठवड्याची गर्भवती असल्याची निदान लागले, या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन पीडितेच्या आई-वडिलांसह तीने स्वतः अखेर आरोपीविरुद्ध मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली, पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत 3,4,5,6, पोक्सो, 376 (1) (A), 376 (2) (JN) 506 नुसार गुन्हा दाखल करून संशयित 23 वर्षीय आरोपीचा शोध घेत अटक केली.
प्रणय महादेव राऊत (23) असे आरोपीचे नाव आहे. तो तीन दिवसाच्या म्हणजे उद्या (ता.9) पर्यंत पोलीस कोठडीत असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ठाणेदार जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर सावंत, पोहवा शंकर बारेकर, हे करित आहे.
अत्याचार व पोक्सो कायद्यात संशयित आरोपीला अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 08, 2024
Rating: