उपसरपंच प्रशांत तोरे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार व विधवा महिलांना साडी चोळी वाटप

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील किन्हाळा ग्राम पंचायतचे उपसरपंच प्रशांत तोरे यांच्या वाढदिवसानिमित्त व मकर संक्रांतीचे औचित्य साधुन सरपंच शुभम भोयर मित्र परिवाराच्या वतीने गावातील संपुर्ण विधवा, निराधार महिलांना साडी चोळी भेट देण्यात आली व मोठ्या थाटात उपसरपंच यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

मित्रपरिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी शुभम भोयर, विशाल सोमटकर, धिरज डांगाले, प्रवीण देठे, योगेश काथवटे, हितेश गायधन, राहुल गाणफाडे, पुष्पराज गाणफाडे, भास्कर कपाळकर, राहुल भोयर, राजु शास्त्रकार, आशिष तोरे, यांच्यासह सर्व महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपसरपंच प्रशांत तोरे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार व विधवा महिलांना साडी चोळी वाटप  उपसरपंच प्रशांत तोरे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार व विधवा महिलांना साडी चोळी वाटप Reviewed by सह्याद्री चौफेर on January 17, 2024 Rating: 5
Powered by Blogger.