सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : शिवसेनेचे तालुका प्रमुख विशाल किन्हेकार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन तहसीलदार उत्तम निलावाड यांच्यावर रेती तस्करांसोबत असलेल्या संबंधांचा खुलासा करीत गंभीर आरोप करून तहसीलदारांची योग्य चौकशी करून कडक कारवाई न केल्यास २६ जानेवारी ला "रस्ता रोको" आंदोलनाचा इशारा दिला.
वाळू प्रश्नावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरून निरुत्तर झालेले तहसीलदार यांचे पितळ उघडे पडले. करणवाडी फाट्यावर महसूल प्रशासनाचे तलाठी राजू श्रीपादवार यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांनी वाळूचा ट्रक पकडला असता त्या अवैध रेती तस्करांनी जीव घेणे शस्त्र बाहेर काढल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी आपला जीव मुठीत घेऊन पळता वाट केली. मात्र,या गंभीर घटनेची पोलीस प्रशासनाकडे कुठलीही तक्रार केली नाही. या प्रश्नावरून पत्रकारांनी तहसीलदारांना धारेवर धरले असता तहसीलदार निरुत्तर झाले व आमच्या कर्मचाऱ्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल होत असल्याचे कारण समोर ठेवून आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार दिली नाही.
मात्र, राजू श्रीपदवार तलाठी हे तहसीलदारांच्या दालनात काही वेळात उपस्थित झाल्यानंतर पत्रकारांनी करणवाडी घटनेच्या प्रश्नांचा भडीमार केला असता, तहसीलदार आणि पटवारी यांच्यामध्ये बोलण्यात बरीच तफावत आढळून आल्याने तहसीलदारांचा बनावट चेहरा उघडा पडून वाळू तस्करांना वाचविणे व शासनाचा महसूल बुडविण्याची भूमिका दिसून आल्याने सर्व ढोंग लक्षात आले असता तहसील कार्यालयाला धन्यवाद देत पत्रकार बांधव तहसीलदार यांच्या दालनाच्या बाहेर निघून गेले.
रेती प्रश्नावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्ना वर तहसीलदार झाले निरुत्तर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 19, 2024
Rating: