टॉप बातम्या

२२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला लोकार्पण होत असून प्रभू राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी राज्य सरकारकडून 22 तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून श्रीराम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी अर्ध्या दिवसाची सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर काही राज्यांमध्ये पूर्ण दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील तसाच निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारकडून देखील 22 जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राम मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं या उद्देशाने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

२२ जानेवारीला राज्यातील सर्व आस्थापना, शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत.


Previous Post Next Post