राज्यस्तरिय आदीवासी परधान समाजाचा उपवधू-वर परिचय मेळाव्यात समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन - माजी नगरसेवक दिगांबर चांदेकर
सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था
वणी : आदिवासी परधान समाज सेवा समितीच्या वतीने यवतमाळ येथे बाळकृष्ण मंगल कार्यालय आर्णी रोड येथे दि,11 फेब्रूवारी 2024 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत आदिवासी परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या आदिवासी परधान समाजातील विवाह उत्सूक मुलामूलींनी या मेळाव्यात येऊन आपला परिचय देण्याकरीता नाव नोंदणी केल्या जाईल व वधू वर परिचय दिलेल्या मुलामुलींचे बायोडाटासह पुस्तक स्मरणीकामध्ये नाव प्रकाशित करण्यात येईल,होणार्या आदीवासी परधान राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्यात मोठ्या संस्खेने परधान समाज बांधव सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले.
परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी आदिवासी परधान समाज सेवा समितीचे यवतमाळ येथील संजय पवार व इतर पदाधिकारी वणी येथे दि,6 जानेवारी 2024 रोजी शहरात दाखल होऊन समाजातील बांधवांसोबत चर्चाकरून मेळाव्यात मोठ्या संस्खेंने सहभागी आवाहन केले.
त्या अनुषंगाने वधू वर यांनी आपली नोंदणी करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करून या मेळाव्याचा फायदा घेऊन आपला जोडीदार निवडावा, अशी विनंती आदिवासी बांधव अशोक नागभिडकर (7387290399) व सामाजिक कार्यकर्ता तथा माजी नगरसेवक, पत्रकार दिगांबर चांदेकर (9921121525) वणी यांनी यावेळी केली आहे.
राज्यस्तरिय आदीवासी परधान समाजाचा उपवधू-वर परिचय मेळाव्यात समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन - माजी नगरसेवक दिगांबर चांदेकर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 07, 2024
Rating: