शिवसेनेचा 6 फेब्रुवारीला चक्का जाम आंदोलनाचा ईशारा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : कोसारा रेती घाटाची सखोल चौकशी करुन तहसिलदार व महसुल अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी तालुका प्रमुख विशाल किन्हेकार यांनी 19 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत केली होती. जर कारवाई झाली नाही तर प्रशासनाच्या विरोधात 26 जानेवारी ला चक्का जाम आंदोलन करण्यात येइल असा ईशारा देण्यात आला होता. मात्र, प्रजासत्ताक दिनाचा सन्मान राखुन उद्या दि.26 जानेवारी 2024 ला सकाळी होणारा "चक्का जाम आंदोलन" तूर्तास स्थगित करण्यात येत आहे. पुढील होणारे चक्का जाम आंदोलन दि.6 फेब्रुवारी 2024 रोज मंगळवार ला मारेगावात करण्यात येईल. अशी माहिती शिवसेनेचे तालुका विशालभाऊ किन्हेकार यांनी पत्रकातून दिली.

या स्थगिती बाबत आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता तालुका प्रमुख विशाल किन्हेकार यांनी सांगितले की, उद्याला प्रजासत्ताक दीन आहे, त्यामुळे या आंदोलनास कुठेही गालबोट लागू नये व आम्ही उभारलेल्या लढ्याला चांगला प्रतिसाद आणि जनतेला न्याय मिळावा म्हणून हा चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. मात्र उद्या होणाऱ्या आंदोलनास तूर्तास स्थगित करण्यात येत आहे. असेही ते म्हणाले...
शिवसेनेचा 6 फेब्रुवारीला चक्का जाम आंदोलनाचा ईशारा शिवसेनेचा 6 फेब्रुवारीला चक्का जाम आंदोलनाचा ईशारा Reviewed by सह्याद्री चौफेर on January 25, 2024 Rating: 5
Powered by Blogger.