सह्याद्री चौफेर | रवी वल्लमवार
पांढरकवडा : केळापूर केळापुर तालुक्यातील कोंढी गट ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपा प्रणित आघाडीने ग्रामपंचायतीवर थेट सरपंचपदी निवडून गेलेल्या वासुदेव पैकाजी गेडाम यांनी आज पदभार स्वीकारला तर उपसरपंचपदी रेखाताई रामु आत्राम यांची निवड करण्यात आली.
तालुक्यातील कोंढी गट ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपा प्रणीत लोकनेते माजी आमदार अन्नासाहेब पारवेकर, माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर, आमदार संदीप धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शहर अध्यक्ष किशोर देशट्टीवार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली असता सत्ता कायम ठेवत ४ सदस्य निवडून आले.
गट ग्रामपंचायत कोंढीच्या निवडणूकीत थेट जनतेतून सरपंच निवडुन आले, तर सोबतच ४ सदस्य निवडून आले असून आज दि. ४ डिसेंबर सोमवार रोजी उपसरपंच पदी सौ.रेखाताई आत्राम यांची एकमुखी निवड झाली. भाजपा प्रणीत कोंढी गट ग्रामपंचायत सरपंच म्हणून वासुदेव गेडाम यांनी आज पदभार स्वीकारला.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष किशोर देशट्टीवार, निलेश ठाकरे, मोबिन पटेल, माजी उपसरपंच अरुण डोळे, अतीश होले, सुधीर धोतुलवार, संजय किनाके, शालिक सुरपाम, अनिल नैताम, सुदर्शन टेकाम, अमोल आत्राम, सुरेश कोप्पुलवार, अनिल देशट्टीवार, रमेश आत्राम, श्रीराम टेकाम, नितेश पेंदोर आदी उपस्थित होते, या प्रसंगी भाजपा कार्यकर्त्यांनी नवनियुक्त संरपच, उपसरपंच, तथा सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.