टॉप बातम्या

अतिवृष्टी पिकविमा पूरपिढीत व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


महागाव | नंदकुमार मस्के 

महागाव : महागाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार) गटाच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत काल दि. ५ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले.

महागाव तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना अतिवृष्टी ची भरपाई, पीकविमा व पुरपिडित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई व आर्थिक मदत मिळणे बाबत मा. गोविंदराव देशमुख तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महागाव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले, सन २०२२ ते २०२३ यावर्षा पासून सतत अतिवृष्टी व पुर नापिकी या नैसर्गिक संकटात शेतकरी सापडला असून शासनाने याची दखल घेतली नाही तसेच वारंवार या बाबी कडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली नाही याबाबत शासनाने त्वरित निर्णय घेऊन ताबडतोब नुकसान भरपाई घोषित करुन संपूर्ण बाधीत शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत घोषित करावी तसेच कापसाला किमान १० ते १२ हजार रुपये सोयाबीनला ७ ते ८ हजार रुपये भाव देण्यात यावा आणि सरसकट विमा मंजुर करण्यात यावा अशी मागणी महागाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली.

मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून,निवेदन देताना रा.काँ. शरद पवार गटाचे महागाव तालुका अध्यक्ष गोविंदराव देशमुख सवना,रा.यु. काँ.तालुका अध्यक्ष स्वप्निल अडकिने महागाव,तसेच रा.काँ.पक्षाचे महागाव तालुकाध्यक्ष तथा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विशाल पवार,वरोडी सोसायटीचे आध्यक्ष नंदकुमार मस्के, अविनाश भांगे, सतीश ठाकरे करंजखेड, उल्हास अडकिने यांच्या सह महागाव तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Previous Post Next Post