मध्यरात्री त्या रेती तस्करांचे वाहन पकडण्यात मारेगावचे महसुल पथक यशस्वी !

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्याच्या शेवट च्या टोकावर असलेल्या नदी पात्रातून दिवस रात्र वाहनाव्दारे अवैध रेती नेण्यांचा सपाटा काही रेती तस्करांनी लावला हाेता. ही बाब मारेगाव महसूल विभागात कार्यरत अधिकारी श्री. घुगाने यांना माहित हाेताच त्यांनी सापळा रचून मध्यरात्री शनीवारी दि.16 डिसेंबरला रात्रीच्या सुमारास एका अवैध रेती वाहनावर दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतल्याचे माहिती आहे. त्यामुळे या धडक कारवाई मुळे तालुक्यातील रेतीची चोरी करणारे अवैध रेती तस्कर चांगलेच धास्तावले आहे.

मारेगाव तालुक्यातील कोसारा, चिंचमंडळ, वेगांव, शिवणी येथील रेतीची चोरी दिवस असो की रात्र, रेतीची चोरी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे सर्वश्रुत आहे. अशातच शनिवारी च्या मध्यरात्री शिवणी घाटातून रेतीचा भरलेला ट्रॅक्टर अवैधरित्या घेऊन जात होता, महसूल अधिकारी व तलाठी याची चालकाला चाहूल लागताच त्याने ट्रॅक्टर जाग्यावर उभा करून पळ काढला. ट्रॅक्टर मालकाचा भाऊ याने प्रशासनाला न जुमनता भरलेला ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर पलटी, सुदैवाने जीवितहानी हानी झाली नसली तरी चोरट्यात व अधिकाऱ्यात सिने स्टाईल झाले असे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले, यात त्यांना किरकोळ दुखाप्तही झाल्याची माहिती आहे. दरम्यान, सरपंच यांचे बंधू सचिन नामदेव रासेकर रा. शिवणी धोबे यांनी रेती भरलेली ट्रॅक्टर भरून जात असताना त्याचा पाठलाग करून अखेर पकडले. तहसीलदार,पोलीस व महसूल अधिकारी यांना पाचारण करून त्यांच्या उपस्थिती पंचनामा करण्यात आला.

"तु चोर मैं सिपाई" दरम्यान,त्यांच्यात चांगलीच दमछाक झाल्याचे समजते, सध्या ट्रॅक्टर तहसील कार्यालयात महसुल प्रशासनाने पुढील कारवाईसाठी जमा केले आहे. या प्रकरणी महसूल अधिकारी यांनी रितसर सदरहु अवैध ट्रॅक्टर सह ट्रॉली चा जप्तीनामा केला असून पुढील कारवाईचा अहवाल तयार करून ट्रॅक्टर मालकावर होईल, अशी माहिती महसूल विभागातून मिळाली.

शासनाचे रेतीचे नवे धोरण न समजन्यापलीकडचे-नागरिक
सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात मिळणार अशा नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी राज्यातील जिल्हा प्रशासनाने केली. मात्र, या धोरणाचा तिळमात्र लाभ, फायदा सर्वसामान्यांना अजिबात होत नसल्याचा तीव्र रोष नागरिकातून व्यक्त होत आहे. एकंदरीत शिजलेले अन्न आपणही खायचं नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ द्यायचे नाही अशी सद्यस्थिती आहे. त्यामुळे शासनाचे रेतीचे नवे धोरण न समजन्यापलीकडचे असल्याचे बोलल्या जात आहेत. मारेगाव तालुक्यातील सर्व घाटांचा लिलाव करावा अशी जोरकस मागणी काही सामाजिक संघटना करित आहे, परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित कामगार, व्यावसायिकदार यांचे वर उपासमारीची आता वेळ आली आहे. तहसीलदार यांनी सरसकट रेती घाट लिलाव करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत.
मध्यरात्री त्या रेती तस्करांचे वाहन पकडण्यात मारेगावचे महसुल पथक यशस्वी ! मध्यरात्री त्या रेती तस्करांचे वाहन पकडण्यात मारेगावचे महसुल पथक यशस्वी ! Reviewed by सह्याद्री चौफेर on December 16, 2023 Rating: 5
Powered by Blogger.