टॉप बातम्या

संताचे विचार आत्मसात करून सामान्यापर्यंत पोहचविले पाहिजे - विजय चोरडिया

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : संताची विचार आत्मसात करून सामन्य माणसा पर्यंत पोहचविण्याचे काम आपण सर्वानी मिळून केले पाहिजे असे, प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप राज्य कमेटीचे सदस्य विजय चोरडिया यांनी केले. ते श्री मल्हारगड दत्त देवस्थान कवडशी येथील दत्त जयंती निमित्ताने बोलत होते.

संस्थेच्या वतीने दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात धार्मिक, पुजा, भजन किर्तन व भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत श्री.चोरडिया यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विचार पिठावर प्रमुख अतिथी म्हणून मंदिर समितीचे मनोज सरमोकदम, बोबडे सर, मनोज केळकर, पवन एकरे, राजु धावंजेवार ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर यात्रेला परिसरातील हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी हजेरी लावली.
Previous Post Next Post